दिल्ली : पॅनकार्डाविना बॅकेचे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र एकाच वेळी एकाच नावाचे दोन पॅनकार्ड्स असणे ही डोकेदुखी ठरु शकते. नुकतेच आयकर विभागाने यासंदर्भात सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, संबंधित व्यक्तीकडे दोन पॅनकार्डस असतील तर त्यापैकी एक पॅनकार्ड्स पुन्हा आयकर विभागाकडे जमा करणे बंधनकारक आहे. प्रामाणिकपणे पॅनकार्ड जमा केल्सास कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र त्यात कुचराई केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बॅक आणि आयकर रिटर्न परतावा भरण्यासाठी पॅनकार्ड हे महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. मात्र एकाच नावाचे दोन पॅनकार्ड असणे हे गुन्हा ठरु शकते. किंबहुना संबंधित व्यक्तीला 10 हजार रुपये दंडासह जेलही होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे असे दुसरे पॅन कार्ड असेल तर अशा पद्धतीने ते परत करा आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जा.तिथे फाॅर्म डाऊनलोड करुन कोणत्याही जवळच्या एनएसडीएल कार्यालयात जमा करा.