---Advertisement---

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीसह चौघाविरोधात गुन्हा

By team
On: February 23, 2024 7:33 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२२ ते आजतागायतपर्यंत फिर्यादी यांच्या सासरी कोर्सेगाव (ता. अक्कलकोट) येथे घडली. या प्रकरणी सानिया अशपाक बिराजदार (वय २०, रा. कुर्बान हुसेन नगर, गुरुनानक चौक) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती अशपाक बिराजदार, सासरा लियाकत बिराजदार, दीर समीर बिराजदार (सर्व रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) नणंद यासीन बंदेनवाज सय्यद (रा. सोरेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी या सासरी नांदत असताना वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना लग्नात मानपान केला नाही, तुझ्या आईने सोने घातले नाही, असे बोलून चारित्र्यावर संशय घेत पट्ट्याने मारहाण केली. तसेच तलाक दे असे म्हणून फिर्यादी यांना माहेरी हाकलून देऊन सासरा लियाकत याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इनामदार हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!