मधुमेह उपचार अन नियंत्रणासाठी डॉ.भास्कर पाटील यांचे कार्य कौतुकास्पद – कुलगुरू डॉ. फडणवीस
मधुमेह शिबीरात 345 जणांची तपासणी
सोलापूर : सोलापूर सारख्या ठिकाणी चांगले उपचार पध्दती आणून डॉ.भास्कर पाटील यांनी मधुमेह रुग्णांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण तयार करून मधुमेह नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस यांनी केले. जागतिक मधुमहे दिनाच्या निमित्ताने डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअरच्या वतीने आयोजित मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी सिध्देश्वर देवस्थानचे धर्मराज काडादी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, श्रीमती किर्तीलक्ष्मी अत्रे, डॉ.अभिजित जगताप आदी मान्यंवर उपस्थित होते.
भारतात दर 10 लोकांमागे 1 जणांना मधुमेह हा रोग जडत चालला आहे. लहान वयातच हा रोग सुरू होत असल्याने प्रत्येकाने जागृत होवून या रोगाचा मुकाबला करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. लहानपणापासूनच या मधुमेहाबाबत जनजागृती झाली पाहिजे. डॉ. भास्कर पाटील यांनी अनेक मधुमेही रुग्णांना उपचार करून बरे केले आहेत. अत्याधुनिक उपचार पध्दतीने त्यांनी मधुमेहींवर उपचार करत आहेत त्यामुळे त्यांचे योगदान कौतुकास्पद आहेत असेही कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस यांनी केले. प्रारंभी डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअरच्या सीईओ डॉ. ज्योती पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी मधुमेह शिबीराच्या आयोजनाची माहिती दिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून शिबीराला सुरूवात करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. भास्कर पाटील यांनी मधुमेह आपल्या आयुष्यातून घालवायचा असेल तर जागृती महत्वाची आहे आणि 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन असून त्या निमित्त 14 महत्वाचे टप्पे आहेत ते कटाक्षाने पाळणे आवश्यक आहेत. त्यामध्ये मनसोक्त पण पोषक आहार, नियमित व्यायाम, नियमित मेडिटेशन, नियमित तपासणी, आरोग्याबाबत काही समस्या असल्यास त्याची योग्य तपासणी आणि त्यावर उपचार, मधुमेहींनी पायाची काळजी घेतली पाहिजे, मानसिक स्वास्थ, शांत झोप, डिजिटल फास्टींग, परिवाराशी एकरूप राहा, आपले छंद जोपासा, नवीन तंत्रज्ञान,मधुमेहाचे शिक्षण आणि स्व काळजी असे महत्वाचे 14 टप्पे आहेत असे डॉ. भास्कर पाटील यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले. त्यानंतर डॉ.मनाली काणे यांनी आहारा विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर योग आणि व्यायामावर धनंजय सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
या शिबीरामध्ये मधुमेही रुग्णामधील टाईप 1 आणि टाईप 2 प्रकारच्या रुग्णांची संपूर्ण तपासणी करण्यात आली तसेच काही रुग्णांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या त्यामध्ये विजयी झालेल्यांना मधुमेहाबाबत आवश्यक असलेले उपकरणे भेट देण्यात आले. शिबीरातील सर्वांसाठी अल्पोहाराची तसेच जनजागृतीसाठी प्रदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मोदी परिसरातील सोनामाता प्रशालेत झालेल्या या शिबीरात दिवसभरात जवळपास 345 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली शेवटी डॉ. दिप्ती गोरे यांनी आभार व्यक्त करून शिबीराची सांगता करण्यात आली.