ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट, पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

मुंबई : मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आली आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र, आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पकडलं आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, भविष्यात असं काही घडलं तर महाराष्ट्रात अँटीड्रोन सिस्टमही नाहीये.

आंतकवादी संघटना कोणत्या प्रकारे हल्ला करतील याचा नेम नाही. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही ही बाब मान्य केली आहे.

महाराष्ट्र सायबर IG यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट 99% आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!