---Advertisement---

रमेश निंबाळ खुन प्रकरणी पिता-पुत्रास २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी

Follow Us:
---Advertisement---

दुधनी : शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी दुधनी येथे झालेल्या शेतकरी रमेश निंबाळच्या खून प्रकरणात पोलिसांनी दुसऱ्या आरोपीस अटक केली असून त्यास अक्कलकोट येथील न्यायालयासमोर उभे केले असता आरोपी चन्नप्पा सैदप्पा व्हसूर वय वर्षे-२० यास न्यायालयाने २४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकाच गुन्ह्यात पिता-पुत्र दोघेही अटक असल्याने दुधनी शहरात हा चर्चेचा विषय बनला असून चर्चेला उधाण आली आहे.

दुधनी येथील शेतकरी रमेश निंबाळ यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी सैदप्पा चंद्रशा व्हसूर यास ताब्यात घेतले होते. त्यासं न्यायालयाने २४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिस तपासात या आरोपात दुसरा आरोपी निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी त्या आरोपीस रविवारी रात्री ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी सैदप्पा होसुर या पहिला आरोपीचा मुलगा चन्नप्पा सैदप्पा व्हसूर वय वर्षे २० हा असा असून त्यास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता चन्नप्पा सैदप्पा व्हसूर याला न्यायालयाने २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!