पुणे : वृत्तसंस्था
आरटीई’ अंतर्गत शाळांमधील २५ टक्के रिक्त जागांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा खासगी शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांकडून नोंदणी करण्यात येत आहे.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत राज्यातील ६६ हजार ६२० शाळांनी नोंदणी केली आहे. तसेच या शाळांमध्ये ‘आरटीई’ अंतर्गत ८ लाख ५४ हजार ४५६ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आहेत. राज्य शासनाने फेब्रुवारीत आरटीई कायद्यात बदल केला आहे. तसेच यंदा आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला उशिराने सुरुवात झाली आहे. अद्याप आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी सुरूच असून, त्याला येत्या २२ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. दरम्यान, यंदा निकष बदलल्यामुळे मनासारख्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल की नाही, याबद्दल पालक साशंक आहेत. शिक्षण विभागातर्फे महापालिका शाळांसह जिल्ह्यांतील झेडपी शाळांनाही ‘आरटीई’ अंतर्गत रिक्त असलेल्या २५ टक्के जागा पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.