ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकनाथ शिंदेंनी मला धमकावले ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ !

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारच्या धोरणासह नागपूर दंगल प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील गंभीर इशारा दिला होता. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत मांडले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार तुघलकी आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही. एकनाथ शिंदे हे मला माफी मागा नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत धमकावत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणाबद्दल एकेरी बोललो नाही, अपमानजनक बोललो नाही. मग माफी का मागावी. सरकारकडून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याबाबत बोलले जात नाही, असेही त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्याची सभ्य, सुसंस्कृत मुल्य आहे. मतभेद असले तरी चालेल पण मनभेद नको. राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असावे, टीका केली जावी पण एकमेकांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व्यक्त्व्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर हा परदेशात पळून गेला. गृहमंत्री आणि तो नागपूर मधील असल्याने त्यांचे परिचय आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सोबत त्याचे सलगीचे संबंध आहे. त्यावर कारवाई न करता औरंगजेब कबर उखडून टाकणे प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. ब्रिटिश हे देखील देशात जुलमी राजवटचे होते त्यांनी अनेक अत्याचार केले. त्यांचे देखील कबर, स्मारक हे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल काढून टाकणार आहे का? कोरटकर देश बाहेर पळून जाताना त्याला कोणी मदत केली, गृह खाते झोपले होते का? पोलिस यांनी त्याला संरक्षण होते का? पोलिसांची त्याला पाळून जाण्यास फूस होती का ? याबाबत गृहमंत्री यांनी उत्तर द्यावे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!