ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोफत भेटवस्तूवर निवडणूक आयोगाची करडी नजर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ येत असतानाच फेक न्यूज व मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी देण्यात येणाऱ्या मोफतच्या भेटवस्तू वाटपावर करडी नजर ठेवा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी आपल्या निरीक्षकांना दिले आहेत. चुकीच्या माहितीला आळा घालणे व मतदारांपर्यंत सकारात्मक माहिती पोहोचवण्यावर भर देण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे निवडणूक आयुक्त व मतदान निरीक्षक यांची बैठक पार पडली. या वेळी देशभरातील १२७ निरीक्षक, ६७ पोलीस अधिकारी आणि १६७ खर्च निरीक्षक उपस्थित होते. मतदारसंघात रोकड, मद्य, मोफत भेटवस्तू व अमली पदार्थांचे वाटप तसेच वितरण रोखण्यासाठी २४ तास निगराणी ठेवण्याचे निर्देश आयोगाने या बैठकीत दिले आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत काय? विशेषतः उष्णतेचा सामना करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत काय ? याची खात्री करावी, अशा सूचना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व सुखबीरसिंग संधू यांनी केल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!