---Advertisement---

तुमच्या सत्तेवर जनता फिरविणार बुलडोझर ; उद्धव ठाकरे

By team
On: April 13, 2024 8:57 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

जनतेच्या विश्वासाला किंमत न देता वाढवण प्रकल्प राबवून तर बघा, ही जनताच तुमच्या सत्तेवर बुलडोझर फिरवेल, अशी कडाडून टीका करतानाच, आमचे सरकार आले तर या वाढवण बंदराचा फडशा पाडून त्या सरकारी कागदावरून वाढवण मिटवूनच टाकू, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पालघरवासीयांना पालघरमध्ये दिली.

महाविकास आघाडीमार्फत पास्थळच्या आंबटगोड मैदानावर आयोजित पहिल्या प्रचारसभेत त्यांनी आपल्या विरोधकांवर आणि सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, मिलिंद वैद्य, आमदार सुनील भुसारा, आमदार विनोद निकोले, उमेदवार भारती कामडी यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

या प्रचार सभेला चार ते पाच हजार कार्यकर्ते जिल्हाभरातून आले होते. येथील जनता महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार भारती कामडी यांना निवडून देऊन दिल्लीमध्ये वाढवण बंदराचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला. वाढवण बंदर हा विकास नसून अदानीच्या घशात जाणारा भाजपचा विकास असल्याचे ठाकरे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!