केंद्रातील मोदी सरकारकडून प्रत्येकाचा भ्रमनिरास ; आ.शिंदेंचा हल्लाबोल
दुधनी येथे हळदी-कुंकू कार्यक्रम व शांभवी गारमेंटस उद्योग समुहाचा शुभारंभ
अक्कलकोट : प्रतिनिधी
सत्तेत येण्यापूर्वी भोळ्या जनतेला पोकळ आश्वासने दिलेल्या मोदी सरकारकडून प्रत्येकाचा भ्रमनिरास झाला आहे.महिला असुरक्षित झाल्या आहेत.प्रत्येक स्तरावर अपयशी ठरलेल्या भाजपामुळे घराघराची आर्थिक घडी विस्कटली आहे,अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
दुधनी ता.अक्कलकोट येथे शांभवी फाऊंडेशनकडुन शांभवी गारमेंटस उद्योग समुहाचा शुभारंभ व हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे होते.तर व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, फाऊंडेशनच्या अध्यक्ष वैशाली म्हेत्रे,चंद्रकांत लोंढे,अन्नपुर्णा म्हेत्रे,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,ऐश्वर्या म्हेत्रे,प्रेमा ढंगे,गुरुदेवी सालक्की,सुभाष परमशेट्टी,गुरुशांत धल्लु,गुरुशांत परमशेट्टी,बसवणप्पा धल्लु,शेखर दोशी,शरणगौड पाटील,गुरू हबशी आदी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत करत संस्थेचे खजिनदार कोमल म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की,दुधनी व परिसरातील शेकडो महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शांभवी फाऊंडेशनकडुन शिलाई गारमेंटस उभारले आहे.ही बाब आदर्शवत आहे.यातुन मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त होणार आहे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी महिलांशिवाय समाजाची व्याख्या अधुरे असल्याचे सांगितले.सुत्रसंचलन आश्विनी येरटे यांनी तर आभार सोनाली चिंचोळी यांनी मानले.
शांभवी फाऊंडेशनकडुन महिलांना स्वावलंबन
शांभवी फाऊंडेशनकडुन महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.याचाच भाग म्हणून रविवारी ५० मशिनरीच्या माध्यमातून गारमेंटस सुरू केले आहे.भविष्यात मार्गदर्शन शिबीरे आयोजित करणार आहोत.
– वैशाली म्हेत्रे (अध्यक्षा-शांभवी फाऊंडेशन)