ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात खळबळ : झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने झोपेतच डोक्यात दगड घालून आपल्या पत्नीचा खून केल्याची संतापजनक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगावात घडली आहे. आरोपीने पत्नीचा फोन करून मेहुण्याला बोलावले, पण माहेरचे येण्यापूर्वीच त्याने मृतदेह भीमा नदीच्या काठावर नेऊन जाळून टाकला.

पोलिसांच्या माहितीनुसार, भाग्यश्री बसवराज कोळी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्याविरोधात खूनाचा, तर त्याचे भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी व शिवानंद आडव्याप्पा कोळी यांच्याविरोधात मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा मंद्रूप पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज व भाग्यश्रीचा 2014 मध्ये विवाह झाला होता. त्यांना आदित्य व अमृता अशी 2 अपत्य आहेत. हे दाम्पत्य निंबर्गी येथे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. पती बसवराज शेतीसोबतच गॅरेजमध्ये काम करत होता. पण त्याला आपली पत्नी फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचा संशय आला. त्यातून त्याने भाग्यश्रीवर पाळत ठेवणे सुरू केले. त्यात त्याला पत्नीचे परपुरुषासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने तातडीने ही गोष्ट लोणी येथे जाऊन बायकोच्या माहेरी जाऊन सांगितली. त्यानंतर तिच्या भावाने तिला समजावून सांगितले. त्यानंतरही भाग्यश्रीच्या वागण्यात बदल झाला नाही.

बसवराजने लोणी (ता इंडी,जि विजयपूर) येथे जाऊन भाग्यश्रीच्या आई, वडील व भावाला हा प्रकार सांगितला होता. मात्र भाग्यश्रीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता. भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी या बसवराजने शनिवारी 22 जून रोजी तेलगाव येथे बोलवून घेतले. तसेच ”तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे”, असे सांगितले. भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला. त्यानंतर भांडण वगैरे करू, नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला.

त्यानंतरही भाग्यश्रीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. अखेर बसवराजने झोपेतच डोक्यात दगड घालून भाग्यश्रीची हत्या केली. त्यानंतर बसवराजचा भाऊ शिवानंद कोळी यांनी बसवराजच्या मेहुण्याला फोन करून माझ्या भावाने तुझ्या बहिणीचा खून केल्याचे सांगितले. त्यावर भाग्यश्रीच्या भावाने आम्ही येईपर्यंत अंत्यविधी करू नका असे त्यांना कळवले. पण तत्पूर्वीच बसवराज व त्याच्या भावांनी अंथरुणासह मृतदेह उचलून भीमा नदीकाठी नेला व तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दिवस उजाडल्यानंतर ग्रामस्थांना ही गोष्ट कळली आणि या प्रकाराची वाच्यता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!