---Advertisement---

फडणवीसांना गांभीर्याने घेऊ नये ; संजय राऊत

By team
On: May 13, 2024 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

आम्हाला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना तशी स्वप्न पडतात. त्यांना सत्तेचा आजार झाला होता. त्यामुळे फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नये. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो आहे. हे फडणवीस यांना माहीत नसावे, ते तेव्हा राजकारणात फार नव्हते, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे धावपळ करतायत. मात्र, त्यांची आता ही शेवटची फडफड आहे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेली मुलाखत हा काळूबाळूचा तमाशा आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली होती. बावनकुळे यांना राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही तमाशाचा अपमान करत आहात. काळूबाळूचा तमाशा ही सांस्कृतिक ताकद होती. काळूबाळू यांनी लोकांना जागृत केले होते. त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी मोठी सामाजिक सुधारणा केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही घेणं-देणं नाही. त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी बावनकुळे यांना दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!