---Advertisement---

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : एक ठार तर दोनजण गंभीर

By team
On: May 2, 2024 9:45 AM
Follow Us:
---Advertisement---

वाशीम : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. या अपघातामध्ये कंटेनर चक्काचूर झाला आहे. तर ट्रकच्या धडकेत एक ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यात लोकेशन चॅनल क्रमांक 181 वर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर कंटेनरच्या टायरमध्ये हवा चेक करण्यासाठी खाली उतरले होते. ते दोघेही रस्त्यावर उभे होते. तेवढ्यात मागच्या बाजुने एक भरधाव ट्रक आला. या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये ट्रकचालक सुध्दा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!