---Advertisement---

माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने ६ वर्षीय मुलाला संपवले !

By team
On: March 23, 2024 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

माढा तालुक्यात कव्हे येथे सहावर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. कौशल्या गणेश चोपडे असे आरोपी आईचे नाव आहे. तर प्रणव (६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरकडील प्रेमप्रकरण सासू सासऱ्यांना कळते की काय? या भीतीने तिने हे कृत्य केले. घटनेच्या दिवशी प्रथमतः तिने ‘टीव्ही पाहतो काय?’ म्हणत लहान मुलाचा गळा आवळला, नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर? असा विचार करून गळा आवळल्यानंतर तिने कुन्हाडीने त्याचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!