---Advertisement---

अखेर NEETच्या UG परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : अखेर NEETच्या UG परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NEET च्या UG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. कोरोनामुळे NEET परीक्षा होऊ शकली नव्हती. मात्र आता या सर्व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून NEET UG 2021 ही परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अप्लिकेशन प्रोसेस उद्या म्हणजेच 13 जुलै संध्याकाळी 5 वाजतापासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी NEET च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करायचा आहे,  अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!