ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर वाल्मिक कराड लावला मकोका

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून सरपंच देशमुख खुनाच्या अनेक अपडेट समोर असतांना आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!