---Advertisement---

सोलापूर जिल्हा पुरवठा विभागात प्रथमच भव्य तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

By team
On: August 7, 2025 9:13 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर: प्रतिनिधी


पुरवठा विभागाच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, सलग तीन महिन्यांच्या धावपळीच्या वाटपानंतर दुकानदार व अधिकाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून भव्य “तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा” आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा 22, 23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे.

आज या अनोख्या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मा. श्री. संतोषजी सरडे साहेब यांच्या दालनात महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत स्पर्धेच्या आयोजनाचे तपशीलवार नियोजन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, या क्रिकेट स्पर्धेत दुकानदारांसोबतच अधिकारी वर्ग देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.

या नियोजनात सोलापूर शहरातून पुरवठा निरीक्षक श्री. राजेश यमपुरे, तर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून श्री. यल्लप्पा वरगंटी साहेब व DSO क्लार्क यांना समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक तालुका व झोननिहाय संघांनी स्वतःचे टी-शर्ट व ट्रॅकपॅन्ट तयार करावेत, अशी सूचना देण्यात आली आहे. मैदानावर अल्पोपहार, चहा, जेवण तसेच क्रिकेट साहित्य याची जबाबदारी आयोजकांकडे राहणार आहे.

विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रदान करण्यात येणार आहेत. उद्घाटन व बक्षीस समारंभास वरिष्ठ अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आजच्या बैठकीस मा. श्री. ओंकारजी पडोळे साहेब (अन्नधान्य वितरण अधिकारी), पुरवठा निरीक्षक श्री. राजेश यमपुरे, श्री. यल्लप्पा वरगंटी साहेब, जिल्हाध्यक्ष श्री. सुनील अण्णा पेंटर, उपाध्यक्ष श्री. वहाब चाचा शेख व उमेश असादे, जिल्हा सचिव श्री. राज कमटम, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. नितीन पेंटर, श्री. वसीम शेख, श्री. खान साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. ही अनोखी स्पर्धा पुरवठा विभागाच्या एकतेचे, संघभावनेचे आणि कार्यसंस्कृतीतील सकारात्मकतेचे प्रतीक ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!