---Advertisement---

माजी आ.दिलीप माने कॉंग्रेसमध्ये दाखल

By team
On: April 1, 2024 9:19 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरू आहे, असेही पटोले यावेळी म्हणाले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते. योग्यवेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!