---Advertisement---

सुप्रीम कोर्टाचा माजी मंत्री मलिक यांना दिलासा !

By team
On: January 11, 2024 4:09 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील काही नेत्यावर अनेक कारवाई सुरु असतांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसते नेते, माजी मंत्री नवाब मलिक आणखी सहा महिने तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून हा दिलासा मिळाला आहे. तर सध्या वैद्यकीय जामीनावर बाहेर असलेले मलिकांनी पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना आता सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.
मलिकांना आधी दिलेल्या जामीनाचा कालावधी संपुष्टात येताच नवाब मलिक यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली. नवाब मलिक यांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशीलही न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर खंडपीठाने मलिकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!