---Advertisement---

भूमीपूजनासाठी जाणाऱ्या आमदारांच्या चारचाकीचा अपघात

By team
On: March 3, 2024 10:03 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात झाला त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे कारमध्ये होते. आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रात्री उशिरा रायगड जिल्हा पोलिसप्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी उसडी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी आणि जासीम अब्दुल रहेमान पासवारे या व्यक्तीच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये जासीम अब्दुल रहेमान पासवारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत फारसा तपशील अजून समोर आलेला नाही. पोलिसांनी सध्या महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. तर हा अपघात भीषण होता की दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही धडकेनंतर उघडल्या गेल्या. अपघात झाल्यानंतर दळवी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!