---Advertisement---

गेवराईजवळ चारचाकी पलटी : सहा जण जखमी !

By team
On: November 30, 2023 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत असतांना बुधवारी सकाळी धामणगाव वैराग येथून चार चाकी कारमध्ये बसून औरंगाबादकडे जात असताना बीड गेवराईजवळ अचानक कारचे पुढील चाक बस्ट होऊन कार पलटी झाली. यात कारमधील सहा जण जखमी झाले. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील रामचंद्र नामदेव घाटे, सतीश लक्ष्मण कोळसे, आसिफ उस्मान पठाण, मनोज महादेव कांबळे, अविनाश रामचंद्र कांबळे व परमेश्वर हनुमंत जाधव (रा. शेळगाव, तालुका बार्शी) असे ६ जण बुधवारी सकाळी टाटा सफारी क्र. एम.एच. १२ बी.एक्स. २३५० या वाहनातून धामणगाव येथून औरंगाबाद येथे निघाले असताना बीड गेवराईजवळ आले असताना अचानक टाटा सफारीचे पुढील टायर बस्ट झाल्याने टाटा सफारी पलटी झाली. यात सर्वांना हात पाय, डोक्यास जखमा झाल्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!