सोलापूर वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्या मुख्य उपस्थितीत उद्या 5 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद महिना मैदानावर संपन्न होणाऱ्या नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या शपथविधीचे खास निमंत्रण नाथ संस्थानचे सद्गुरु व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मिळालेले असून या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराज आज मुंबई साठी रवाना झाले आहेत.
देशाचे पंतप्रधान गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री गण व अन्य मान्यवरांसोबत महाराष्ट्रातील ख्यातनाम संत महंताना ही या विशेष शपथविधी सोहळ्याकरता सन्मानाने निमंत्रित केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष या नात्याने महाराज या सोहळ्यास निमंत्रणावरून उपस्थित राहत आहेत.
आपल्या गुरु गादीचे सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ शपथविधी करिता हजर राहणार यामुळे शिष्य व भक्त वर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.