---Advertisement---

मारकडवाडीत 17 जणांसह 100 ते 200 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

By team
On: December 4, 2024 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, वृत्तसंस्था 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून मोठी बातमी समोर आलीय. या गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे. तसंच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.

 

आरोपीवर गुन्हे दाखल

 

1) संजय हरिभाऊ वाघमोडे

2) राजेद्र अंकुश मारकड

3) वैभव वाघमोडे

4) विजय वाघमोडे

5) विलास आद्रट

6) रणजित जिजाबा मारकड

7) लक्ष्मण सिताराम मारकड

8) सर्जेराव बाबुराव लोखंडे

9) संदिपान आण्णा मारकड

10) अमित वाघमोडे

11) दत्तु राघु दडस

12) आबा नाना मारकड

13) बबन दादा वाघमोडे

14) मारुती शंकर रणदिवे

15) नानासाहेब मारकड

16) संजय नरळे

17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी.

18) इतर 100 ते 200 लोक

 

नेमकं प्रकरण काय ?

मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचं एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झालं १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!