मारुती बावडे
अक्कलकोट, दि.७ : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.यावेळी आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेल्या स्थितीवर मात कशी करावी यासाठी पोलिसांचे दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पार पडले.अक्कलकोट शहरातील मिरवणूक मार्ग म्हणजे पोलीस ठाणे,विजय कामगार चौक,मंगरुळे पेट्रोलपंप,बागवान मज्जीद,करंजा चौक,मक्का मजीद,सावरकर चौक,मुजावर गल्ली,फतेसिंह चौक मार्गे पथ संचलन घेण्यात आले.त्याच दरम्यान
फतेसिंह चौक येथे ‘कायदा व सुव्यवस्थाच्या’
अनुषंगाने मॉक ड्रिल राबविण्यात आले.
या पथसंचलनात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोसई चंद्रकांत पुजारी, पोलीस ठाणेकडील २७ पोलीस अंमलदार,स्ट्रायकिंगचे २० अंमलदार एसआरपीएफचे एक सेक्शन, ४० होमगार्ड उपस्थित होते.या पथसंचलना दरम्यान मुख्य रस्त्यावर मॉक ड्रिल अतिशय प्रभावीपणे व परिणामकारक राबविण्यात आल्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनी दिली.