---Advertisement---

मोठा झटका.. गॅस सिलिंडरचे भाव वाढले

By team
On: December 1, 2024 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

 

सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे.  भारतीय तेल विपणन कंपन्यांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. आजपासून नवा महिना सुरू झाला असून डिसेंबर महिना सुरू होताच गॅस सिलिंडरचे दर महागले आहेत. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली असून सामान्य एलपीजी म्हणजेच घरगुती 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक LPG सिलिंडरचे नवीन दर आज 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झाले आहेत.

 

 एलपीजीच्या किंमती

 

दिल्ली – 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून ती 1818.50 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.

 

मुंबई – 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांनी वाढ झाली असून तो 1771 रुपये प्रति सिलिंडरवर आला आहे.

 

चेन्नई –  व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली असून ती 1980.50 रुपये प्रति सिलिंडरवर आली आहे.

 

कोलकाता – 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 15.50 रुपयांनी वाढली असून ती 1927 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.

 

विशेष बाब म्हणजे देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांपैकी फक्त कोलकाता येथे गॅस सिलिंडर सर्वाधिक दरात उपलब्ध आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सलग पाच महिन्यांपासून वाढत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ऑगस्टपासून सातत्याने वाढत आहेत आणि डिसेंबरसह सलग पाच महिने 19 किलो गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!