मुंबई : वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आदी दिवंगत नेत्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करून केंद्रातील भाजप सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे, तर हेच औदार्य त्यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दाखवून त्यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करावा, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली.
केंद्रातील मोदी सरकारने शुक्रवारी काँग्रेस नेते व माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, शेतकरी नेते व माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक, कृषीशास्त्रज्ञ डॉ. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांनी या नेत्यांच्या मांदियाळीत बाळासाहेबांचाही समावेश झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त केली.
त्यांनी वायाचत भाष्य करताना म्हटले की, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि एस. स्वामिनाचन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला, या यादीतील स्वामिनाथन यांचे अवध्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा चहुमान मिळायला हवा होता, नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, प्रणब मुखर्जीना आदी नेत्यांना केंद्रातील भाजप सरकार भारतरत्न पुरस्कार घोषित करत असेल, तर चाव्यसाहेब ठाकरेंना देखील भारतरत्न घोषित करायला हवा, देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेवांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.