---Advertisement---

घटस्थापनेनंतरच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ !

By team
On: September 24, 2025 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

घटस्थापनेच्या दिवशी उच्चांक गाठलेल्या सोनं-चांदीच्या किमतींनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी आणखी उसळी घेतली. स्थानिक सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 1,339 रुपयांची, तर चांदीत प्रतिकिलो 1,030 रुपयांची वाढ नोंदवली गेली. सोमवारी (घटस्थापनेदिवशी) 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम (जीएसटीसह) ₹1,15,978 या उच्चांकावर पोहोचलं होतं. मंगळवारी सकाळीच बाजार उघडताच ₹1,339 ची वाढ होऊन सोन्याचा दर थेट ₹1,17,317 वर पोहोचला. यामुळे तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात तब्बल ₹8,850 इतकी वाढ झाली आहे.

तसेच, चांदीच्याही दरात मंगळवारी सकाळी ₹1,030 रुपयांची वाढ झाली. सोमवारी चांदी ₹1,38,020 प्रति किलो (जीएसटीसह) दराने विकली जात होती. वाढीनंतर चांदीने ₹1,39,050 या नव्या उच्चांकाला गवसणी घातली. एक सप्टेंबरला चांदीचा दर ₹1,28,000 पर्यंत होता. त्यानंतर आतापर्यंत सुमारे ₹11,000 हून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या दरवाढीमागे देशोदेशीच्या गुंतवणूकदारांची आणि मध्यवर्ती बँकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी कारणीभूत ठरली आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, मागणी वाढून दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची मागणी वाढत असून, दरवाढ लक्षात घेता अनेक ग्राहक जुने दागिने बदलून नवीन नक्षीचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. सराफ व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, “दर कितीही वाढले तरी सणासुदीचा काळ असल्याने विक्रीचं एकूण मूल्य वाढणारच आहे.”

सध्याचे दर (जीएसटीसह):

सोने (24 कॅरेट) : ₹1,17,700 प्रति तोळा

चांदी : ₹1,40,000 प्रति किलो

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!