ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी : नव्या- जुन्या गाड्यांच्या किंमतीत लाखोंची कपात !

मुंबई : वृत्तसंस्था

भारत सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत मोठे बदल करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून, याचा थेट परिणाम नव्या आणि जुन्या गाड्यांच्या किमतींवर दिसून येतो आहे. कार बाजारात उत्साहाचं वातावरण असून ग्राहकांना लाखों रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.

GST दरातील बदलाचा फायदा फक्त नव्या गाड्यांपुरता मर्यादित न राहता सेकंड हँड (पूर्व-स्वामित्व) गाड्यांनाही झाला आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट, हुंडाई आय २०, होंडा सिटी, टाटा नेक्सॉन, हुंडाई क्रेटा, किया सेल्टॉस यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किंमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. प्री-ओन्ड कार विक्री करणारी प्रमुख कंपनी स्पिनी ने ग्राहकांसाठी धमाकेदार सवलत जाहीर केली आहे. कंपनीने स्पष्ट केलं की २२ सप्टेंबरपूर्वी गाडी खरेदी करणाऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. ही ऑफर GST लागू होण्याआधीच मर्यादित आहे, त्यामुळे ग्राहकांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

स्पिनीच्या म्हणण्यानुसार, वापरलेल्या गाड्यांच्या चांगल्या मागणीमुळे, गाडी विकणाऱ्यांनाही फायदा मिळत असून प्रति गाडी सरासरी २०,००० रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो आहे. इतर मोठ्या प्लॅटफॉर्मसपैकी कार्स २४ ने देखील नवे “GST रिलीफ कॅम्पेन” लाँच केले आहे. यामध्ये ग्राहकांना ८०,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार असून ही ऑफर विविध ब्रँड्सच्या सेकंड हँड गाड्यांवर लागू आहे. दसरा, दिवाळी, नवरात्र या सणासुदीच्या काळात वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. GST दरात बदल आणि कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!