ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

अक्कलकोट  : प्रतिनिधी

कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी समर्थांची प्रतिमा व प्रसाद देवून सत्कार केला.याप्रसंगी डिजिटल मिडिया संघटनेचे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप सिद्धू पुजारी हे पदाधिकारी तसेच पत्रकार शिवानंद फुलारी, मुंबईचे उद्योजक सिध्देश्वर चव्हाण,कुंदन हुलावळे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक विजय बोराडे,प्रा.राम तांबट उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!