दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिली आहे. “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना उदंड आनंदाने चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया” असा खास शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिले आहेत.
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया.
वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2021
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असे शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्या आहेत.
आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजविण्यात आले आहे. त्या बरोबरच मंदिरावर आकर्षक असे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर उजळून निघाले आहे.
लाखो वारकऱ्यांचे उपस्थितीत येणारे माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस मधून पंढरपुरात दाखल झाले आहेत या वेळी मोजकेच वारकरी या पालखीसोबत उपस्थित होते.