---Advertisement---

लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांना चपळगाव ग्रामपंचायतीत अभिवादन

By team
On: May 9, 2024 3:52 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

चपळगावचे दिवंगत माजी सरपंच तथा लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामपंचायत चपळगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्याग,निष्ठा आणि निस्वार्थी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे स्वर्गीय सुर्यकांत बाणेगाव यांची चपळगाव परिसरात लोकनेते म्हणून ओळख झाली.

कधी त्यांनी पक्षभेद केला नाही.समाजकारण व राजकारणात एक वेगळा ठसा निर्माण करून या परिसरामध्ये त्यांनी लोककल्याणकारी कामे केली,असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते रियाज पटेल व महेश गजधाने यांच्या हस्ते बाणेगाव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सरपंच उमेश पाटील,सिद्धाराम भंडारकवठे,युवा नेते बसवराज बाणेगाव, जेष्ठ नेते नंदकुमार पाटील ,संजय बाणेगाव,महादेव वाले, ग्रा.पं.सदस्य परमेश्वर वाले, महिबूब तांबोळी, श्रावण गजधाने,सुरेश सुरवसे , कुमार दुलंगे ,राजकुमार कोळी, मोहन दुलंगे,सुभाष बुगडे ,भीमाशंकर दुलंगे, उमेश सोनार, रवी कोरे ,दिलीप गजधाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले. तर आभार बाणेगाव यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!