---Advertisement---

आंबेडकरांचा गौप्यस्फोट : शरद पवार भाजपसोबत जाणार !

By team
On: May 9, 2024 3:28 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला असून आता राजकीय वातावरण देखील तापले असून विविध पक्षांच्या प्रचारसभानांही वेग आला असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली. बीडमध्ये वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

बीड जिल्ह्याची निवडणूक रंगात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस इथे थांबणार आहेत. कालच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की, आपण एका बाजूला म्हणत आहेत की, भाजपला हरवलं पाहिजेत, सत्तेपासून खाली खेचलं पाहिजेत. उद्या आपण तेच वाक्य वापरणार याची मला खात्री आहे. पण राजनाथ सिंह यांना आपण फोन का केला होता याचे उत्तर तुम्ही अजून दिलेले नाही असा सवाल आंबेडकर यांनी विचारला.

राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, त्यामुळे हा सुध्दा वजनदार माणूस आहे. या माणसाला आपण अचानक फोन का केलात ? काय बोलणे झाले ? लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा झालीय का ? आणि तसे असेल, तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावे की, भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत. उद्या फसवले जाणार नाहीत, यासाठी मी इथल्या मराठा समाजाला आवाहन करतोय की, त्यांनी बजरंग सोनावणे यांना मतदान करू नये, असे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!