बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई सुरु असतांना नुकतेच बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा बुधवारी सायंकाळी बीड ग्रामीण व शहर पोलिसांनी भांडाफोड केला.पोलिसांनी ३ ठिकाणी धाड टाकून, २६लाखांची रोकड जप्त केली. पाचसंशयितांना चौकशीसाठी ताब्यातघेतले गेले आहे. नोटांवर कोडवर्डलिहून देशभरात हवाल्याचे पैसेपाठवले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरतअसल्याची माहिती पोलिस अधीक्षकअविनाश बारगळ यांना मिळाली होती.त्यांनी बीड ग्रामीण ठाण्याचे सहायकपोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांनाकारवाईचे आदेश दिले होते. एपीआयदराडे, पीएसआय नितीन काकरवाल,पीएसआय ज्ञानेश्वर कुकलारेयांच्यासह शहर ठाण्याचे पीआयशितलकुमार बल्लाळ, एपीआय बाबाराठोड यांच्या पथकाने बीड शहरातीलडीपी रोडवरील सारडा सेंट्रल, कबाडगल्ली व जालना रोडवरील सहकारभवन परिसरात अशा तीन ठिकाणीछापेमारी केली. एका ठिकाणाहून १८लाख, दुसऱ्या ठिकाणाहून ३ लाख तरतिसऱ्या ठिकाणाहून ५ लाख अशीसुमारे २६ लाख रुपयांची रोकड जप्तकरण्यात आली आहे. हवालामार्फतराज्य व राज्याबाहेर विविध ठिकाणी हे व्यवहार होत होते. पोलिसांनी छापेमारी केलेल्या कार्यालयातील पाच तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दुचाकी, मोबाईल, नोटा मोजण्याच्या मशीन जप्त केल्या आहेत.
हवाला रॅकेटमध्ये पैसे जमा केल्यानंतर संबंधिताला एका नोटवर एक क्रमांक लिहून जात होता. त्या क्रमांकाच्या आधारे समोरच्या व्यक्तीकडून दुसऱ्या ठिकाणी रक्कम मिळत होती. यात रकमेनुसार २ ते १० हजारांपर्यंत कमशीन हवाला चालकाला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केल्यानंतर शहर ठाण्यातया नोटांची मोजदाद करण्यासाठी पोलिसांना नोटामोजण्यासाठी मशीन वापरावी लागली. रात्री उशीरापर्यंतया प्रकरणात चौकशी व नोंद करण्याचे काम सुरु होते.