ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भरधाव बसची जबर धडक : पोलीस भरतीची तयारी करणारे तीन तरुण ठार

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना पुन्हा एकद एका भीषण अपघाताचे चर्चेत आला आहे. बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. बीडजवळ घोडका राजुरी येथे आज सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रूवान घोडके (वय १९), ओम सुग्रीव घोडके (वय २०) अशी मृत तरूणांची नावे आहेत. बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला पाच तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते. यावेळी परभणी बसने पाचही तरूणांना उडविले. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले. मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाले. तिन्ही मृत तरूणांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!