ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गृहमंत्री फडणवीसांनी तरुणांना दिली आनंदाची बातमी : लाखो भरतीचा विक्रम

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला होता तर आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे.

राज्य सरकारने 77 हजार 305 लोकांना नोकरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 1 लाख पेक्षा जास्त भरती केली असून हा विक्रम असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने गट ‘क’ च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने भरती केलेल्या 77 हजार 305 पदांमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गट ‘क’ च्या जागा आपण टप्पा टप्याने भरणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने गट ‘क’च्या जागा टप्प्या टप्प्याने एमपीएससीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची महाती देखील त्यांनी दिली आहे. लोकांची मागणी होती त्याप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!