---Advertisement---

महाप्रसादाच्या सेवेमुळे देशभरात पोहचले श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव ; पै.चंद्रहार पाटील

By team
On: July 1, 2024 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली महाप्रसादाची सेवेमुळे देशभरात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव पोहचले असल्याचे मनोगत दुहेरी महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरेयांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी नगरसेवक पै.सद्दाम शेरीकर, सर्फराज शेख यांच्यासह न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुर, गोटू माने, निखील पाटील, प्रविण घाटगे, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!