ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हच्या उद्घाटनाला मान्यवरांची मांदियाळी; हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात भर


अक्कलकोट, दि.१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोटमध्ये प्रथमच हॉटेल फोर पेटल्स या एक्झिक्यूटिव्ह हॉटेलचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात आणि सौंदर्यात भर पडल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली.या देखण्या हॉटेलने अक्कलकोटवासियांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले.प्रारंभी सायंकाळी ६ वाजता हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर एजाज मुतवल्ली,हॉटेलचे चेअरमन इम्रान मुतवल्ली,संचालक
नसरोद्दीन मुतवल्ली,हसीना मुतवल्ली,शाद मुतवल्ली,आझम मुतवल्ली,अदा मुतवल्ली,सफा मुतवल्ली,जिक्रा
मुतवल्ली,अलिझा मुतवल्ली,वसीम सुलतान,अकमल सुलतान,अफ्रा सुलतान या परिवारातील सदस्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आलेल्या प्रमुख अतिथी मान्यवरांचे स्वागत मुतवल्ली बंधूंनी केले.या सोहळ्याला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले,शिवपुरीचे डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख,माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा,रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर,रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,जेष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी,
दक्षिणचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी,उत्तरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, मुख्याधिकारी सचिन पाटील,दक्षिणचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, उत्तरचे तहसीलदार सैपन नदाफ,लायन्सचे प्रांतपाल राजशेखर कापसे,अध्यक्ष मल्लिकार्जुन मसूती,माजी नगरसेवक महेश हिंडोळे,
डॉ.जी.आर शर्मा,डॉ.अनुपम शहा, गायक मोहम्मद अयाज,उद्योगपती प्रिर्यदर्शन शहा,रोटरी क्लबचे अध्यक्ष बसवराज चिणकेकर,अशोक येणेगुरे,प्रशांत सिंगी,काँग्रेसचे शहराध्यक्ष रईस टिनवाला,एजाज बळोरगी,सद्दाम शेरीकर,लाला राठोड,बंटी राठोड आदिंसह विविध क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी हॉटेल फोर पेटलच्या टीमला शुभेच्छा दिल्या.अक्कलकोट शहराचा वाढता विस्तार आणि व्हीआयपी भाविकांची संख्या लक्षात घेता अशा प्रकारच्या हॉटेलची नितांत गरज होती.या हॉटेलमध्ये भाविकांना एक्झिक्यूटिव्ह, प्रीमियम आणि सूट अशा तीन प्रकारच्या रूम्स उपलब्धअसून सर्व रूम वातानुकूलित आहेत.प्रशस्त पार्किंग, स्वतंत्र स्वागत कक्ष असलेले हॉटेल अक्कलकोट शहराचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे आता परगावच्या भाविकांची चांगली सोय होईल,असा विश्वास उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.या हॉटेलमध्ये लक्झरी एलिमेंट प्युअर व्हेज रेस्टॉरंटची सुविधा असून एमबॉसीस द पार्टी हॉलमध्ये किमान शंभर लोकांसाठी मीटिंगची व्यवस्था,बर्थडे पार्टी ,एक्जीबिशन हॉल म्हणून
तसेच गेट-टुगेदर, बफे सिस्टीम जेवणासाठी आकर्षक हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याला देखील अक्कलकोटकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल,असेही काही मान्यवरांनी शुभेच्छा देताना आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाला आलेल्या सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.प्रत्येक रूम्समध्ये फ्री वायफाय, एलईडी स्मार्ट टीव्ही, लिफ्टची सोय प्रत्येक रूममध्ये तातडीची सुविधा, तापमान नियंत्रित रूम्स यासारख्या सुविधा २४ तास उपलब्ध राहणार आहेत,
असे मॅनेजिंग डायरेक्टर एजाज मुतवल्ली यांनी
उपस्थितांना सांगितले.

 

हॉटेल बनले भाविकांचे
आकर्षण

अक्कलकोट शहरामध्ये ए- वन चौकापासून
ते मंगरुळे बायपासच्यामध्ये डाव्या बाजूला रस्त्यालगत हे हॉटेल असल्याने अक्कलकोट सह भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.दर्जेदार सुविधा, उत्तम व्यवस्था,प्रशिक्षित स्टाफ हे या हॉटेल फोर पेटल्सचे एक्झिक्यूटिव्हचे खास वैशिष्ट्य असून याचा शहरातील नागरिकांसह भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.

एजाज मुतवल्ली,मॅनेजिंग डायरेक्टर

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!