---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. या भेटी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

या भेटी संदर्भात प्रसारमाध्यमांशी माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार यांनी आज घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!