मारुती बावडे
अक्कलकोट,दि.८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९४.१२ टक्के लागला आहे. या निकालाचा एकूण विचार केला तर या परीक्षेत यावेळी मुलांनी बाजी मारली आहे.
या परीक्षेला तालुक्यातून विविध शाळा व
महाविद्यालयातून एकूण २ हजार ५८६ विदयार्थीपैकी २ हजार ४३४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.यात मुलांची टक्केवारी ९४.०९ तर मुलींची टक्केवारी ९४.०८ इतकी आहे.त्यात ३६५ विषेश प्राविण्य,१ हजार ३६१ प्रथम श्रेणी, ६७५ द्वितीय श्रेणी याप्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी निकालांमध्ये मुली ह्या मुलापेक्षा पुढे असतात पण यावेळी उलटे चित्र आहे.मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारी पेक्षा मुलांची टक्केवारी एका पॉईंटने अधिक आहे.यावर्षी देखील निकालाच्या अनधिकृत तारखा सारख्या सोशल मिडियावर येत होत्या पण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अचानक काल तारीख जाहीर केली. आज अधिकृत निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी व पालक यात समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल याप्रमाणे.सी.बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट ९३.८० टक्के,मंगरूळे उच्च माध्यमिक प्रशाला ८५.९६ टक्के, काशिराया काका पाटील उच्च माध्यमिक प्रशाला अक्कलकोट ९७.८२ टक्के,बसवराज उच्च माध्यमिक प्रशाला करजगी ९८.४८ टक्के,एच. जी प्रचंडे उच्च माध्यमिक प्रशाला नागणसुर ९८.९५ टक्के , सिद्धरामेश्वर उच्च माध्यमिक प्रशाला तोळणुर ९०.६२ टक्के,अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशाला हन्नूर १०० टक्के, मातोश्री गुरुशांतवा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक प्रशाला अक्कलकोट १०० टक्के,मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय केगांव ९४.७३ टक्के, ग्रामीण विद्याविकास ज्युनिअर कॉलेज चपळगाव ९७.१८ टक्के,एस.एस शेळके उच्च माध्यमिक विद्यालय वागदरी ९०.२४ टक्के,
श्री शिवचलेश्वर महाविद्यालय मैंदर्गी ८३.०५ टक्के, श्री गुरुशांतलिंगेश्वर महाविद्यालय दुधनी ९९.२५ टक्के,श्री जे.पी.उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ९७.८२ टक्के,धोंडूबाई स्वामी उच्च माध्यमिक विद्यालय चुंगी ९६.८७ टक्के,जयशंकर उच्च माध्यमिक विद्यालय तडवळ ८६.८६ टक्के, सिध्दाराम म्हेत्रे ज्युनिअर कॉलेज अक्कलकोट स्टेशन ९० टक्के, एस.एस.म्हेत्रे ज्युनिअर आश्रम महाविद्यालय रुद्देवाडी ९७ टक्के, कै. परशुराम जाधव ज्युनिअर कॉलेज कोन्हाळी ९१.४२ टक्के, के.एस.एम.ज्युनिअर कॉलेज नागनहळ्ळी ९९.१४ टक्के, कै. हरिश्चंद्र राठोड ज्युनिअर कॉलेज कडबगांव ९२.५५, जेऊरच्या काशिविश्वेश्वर उच्च माध्यमिक प्रशालेचा ८८.८८ टक्के,मैंदर्गीच्या
अल हज जैनब बी उर्दू माध्यमिक विद्यालयाचा ९०.२७ टक्के ,एस बी खेडगी होकेशनल १०० टक्के,ग्रामीण विद्या विकास चपळगाव व्होकेशनल ९५.१४ ,बसवराज व्होकेशनल महाविद्यालय करजगी ९१.०७
असा लागला आहे.