ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मी त्यांचा शिरच्छेद करेल : अभिजित बिचुकले संतापले !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. आता या प्रकरणात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशात जर कोणी बोलत असेल तर मी देवा भाऊंना सांगू इच्छितो, फाशी द्यायला जसा जल्लाद असतो तसा मला परवाना द्या. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, तर मी त्यांचा शिरच्छेद करेल, मला परवाना द्या.

यावेळी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर देखील टीका केली आहे. राहुल सोलापूरकरला शिवेंद्रराजे आवजाव बोलतात त्यांना मंत्रिपद जाण्याची भीती आहे का? जयंतराव पाटील मागे बोलले होते मंत्रिपदाचा तुकडा मिळाला की शिवेंद्र राजे तिकडे जातात. शिवेंद्रराजे सरकारमध्ये शिपाई आहेत का? की मंत्री आहेत. शिवेंद्रराजेंनी देवा भाऊंच्या तोंडावर राजीनामा फेकावा. देवेंद्र फडणवीस परमिशन देणार असतील तर मी शस्त्र हातात घेईल, मी गेल्या जन्मी राजा होतो.

दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पिकविमा देत आहोत, असे ते म्हणाले होते. यावर बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, त्यांनी जर शेतकऱ्यांचा अपमान केला असेल, तर मी त्याचा खरपूस समाचार घेणार, असे बिचुकले म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!