---Advertisement---

लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By team
On: February 4, 2026 10:59 AM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था 

लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ज्या उमेदवाराच्या मागे महिला उभ्या राहतात, त्याचाच नंबर पहिला लागतो, असे सांगत त्यांनी महिलांना मतदानाचे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे.”

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. “अशा दुःखाच्या काळातही आम्हाला प्रचाराला यावे लागते. निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात,” असे शिंदे म्हणाले. प्रचार करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरच्या मातीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “कोल्हापूरच्या मातीला वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे.” काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असून, या लढाईत नेहमी जनशक्तीच जिंकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पक्षाचा पाया मजबूत करणाऱ्या निवडणुका असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “मी आज नेहमीसारखे भाषण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचारासाठी आलो आहे.” नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली असून, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार व एक खासदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “गेल्या वेळी थोडक्यात सुटले, पण पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!