ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे संसदेत पोहचल्यास आरक्षणाचा आवाज बुलंद होणार ; अॅड. आंबेडकर

अकोला : वृत्तसंस्था

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आता सरकारच्या विरोधात मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघत आहे तर दुसरीकडे सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींचा सांगण्यात येत असलेला ५४ लाखांचा आकडा फसवा असून ओबीसींना उचकावण्याचे प्रयत्न हाेत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनाेज जरांगे पाटील यांनी याबाबत राजकीय भूमिका घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असेही आवाहन त्यांनी केले.मराठा आरक्षणासाठी मुंबईत हाेणाऱ्या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आमदार बच्चू कडू हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले हाेते. मात्र बाेलणी यशस्वी झाली नसल्याचे दिसते. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठा नेतृत्व उभे राहत असून गरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे. ते लोकसभा निवडणुकीत उतरल्यास आणि ते संसदेत पाेहाेचल्यास आरक्षणाचा आवाज आणखी बुलंद हाेईल, असेही ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!