ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुलगी असल्यास तुम्हाला ही मिळणार सरकारी योजनेत ७२ लाख !

देशातील अनेक राज्यात मुलीच्या जन्मापासूनच तिचे पालक तिच्या भविष्याची चिंता करू लागतात. तिच्या शिक्षणासाठी, चांगल्या करिअरसाठी, आणि योग्य वेळी तिच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसा लागणार हे त्यांना माहीत असते. त्यामुळे लोक सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असतात. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सरु केली आहे.

या योजनेचे पैसे सुरक्षित राहतात. बाजार खाली आला, अर्थव्यवस्था मंदावली, जगांत काहीही घडलं, तरी तुमच्या गुंतवणुकीचा एक रुपयादेखील बुडण्याचा धोका नाही. ही सरकारी हमी आहे. विशेष म्हणजे आज देशात जवळपास चार कोटींहून अधिक सुकन्या खाते उघडले गेले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेत आपण केलेली गुंतवणूक केवळ सुरक्षित नसते, तर त्यावर चक्रवाढ व्याजामुळे रक्कम झपाट्याने वाढते. या योजनेत फक्त 15 वर्षे पैसे भरायचे असतात आणि खाते 21 वर्षांनी मॅच्युर होते. म्हणजेच, शेवटच्या 6 वर्षांत तुम्ही गुंतवणूक थांबवता, तरी तुमचे पैसे सतत वाढत राहतात.

या योजनेवर सरकारने 8.2 टक्के व्याजदर लागू केला आहे, जो देशातील बर्‍याच योजनांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. जर आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर्षाला 1.50 लाख रुपये गुंतवले, तर 15 वर्षांत एकूण 22 लाख 50 हजार रुपये जमा होतात. पण मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत या रकमेवर मिळणारे व्याज मिळून एकूण रक्कम सुमारे 72 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. म्हणजेच गुंतवलेली रक्कम जवळपास तीन पट वाढते.

या योजनेत करसवलतही मिळते. कारण ही योजना EEE श्रेणीत येते. गुंतवणुकीवर कर लागू होत नाही, त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही कर नसतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी रक्कमदेखील करमुक्त असते. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर कुठेही कराचा बोजा पडत नाही. पण ही करसवलत मिळण्यासाठी जुनी करप्रणाली निवडलेली असावी, हे मात्र लक्षात ठेवावे.

या योजनेच्या अटी देखील अतिशय सोप्या आहेत. मुलगी जास्तीत जास्त 10 वर्षांची असताना खाते उघडता येते. पालकांनी प्रत्येक वर्षी मोठी रक्कमच टाकायला हवी, असा काही नियम नाही. इच्छेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्ही 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि गुंतवणूक वाढवतही जाऊ शकता. पैशाची अडचण आली तर एखाद्या वर्षी कमी रक्कम टाकली तरी खाते बंद होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!