---Advertisement---

आयएमएचा रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांनी दोन दिवसांपूर्वी अलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर बाबा रामदेव यांनी माघार घेतली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे. या संदर्भात उपचार पद्धतींची संघर्षपुर्ण वादाला मी इथे थांबवतो. आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा यांनी सांगितले होते.

मात्र आता बाबा रामदेव पुन्हा अडचणीत सापडले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना 1 हजार कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली आहे त्यात बाबा रामदेव यांना पुढील पंधरा दिवसात त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितले नाही तर त्यांच्याकडे हजार कोटी रुपयांची मागणी केली जाईल तसेच कोरोनिल किटची दिशाभूल करणारे जाहिराती सर्व ठिकाणाहून हटविण्यास सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!