ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा पिक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी या नोंदणीला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत आहे.

सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे. याची नोंदणी केल्यास शेतकऱ्याला पीक नुकसान अन्य काही सरकारी मदत असो याचा लाभ मिळू शकणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही; त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी यंत्रणेवर नोंदणी करण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांना या कालावधीत नोंदणी करता येईल. त्यामुळं सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!