ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटचा पदगृहण सोहळा उत्साहात : अध्यक्षपदी रुपाली शहा

अक्कलकोट  : प्रतिनिधी

अक्कलकोट शहरात प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.हॉटेल फ़ोर पेटल्स येथे पार पडलेल्या या सोहळ्याला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभना पालेकर (पनवेल )तसेच डिस्ट्रिक्ट सर्विस ऑफिसर आशा देशपांडे (पुणे) तसेच झोनल कोऑर्डिनेटर रेखा माने (सोलापूर ), डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन लता शिवशंकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी दीपशिखा पाठक, एडिटर स्मिता चाकोते आदींची उपस्थिती होती.

या क्लब साठी स्पॉन्सरर क्लब जयसिंगपुरच्या चार्टर प्रेसीडेंट अश्विनी पाटील उपस्थित होत्या.इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटचा पहिला अध्यक्षपदाचा बहुमान रूपाली शहा यांना मिळाला.तसेच सेक्रेटरी म्हणून सलोनी शहा व खजिनदारपदी शीला माशाळे यांची निवड झाली.यावेळी नूतन अध्यक्ष शहा यांनी क्लबचे उद्दिष्टे व क्लब काढण्यामागचा उद्देश पूर्णपणे लोकांसाठी वाहून समाजासाठी कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी पहिल्याच इन्स्टॉलेशनच्या दिवशी रुग्णांसाठी रुग्ण उपयोग ही साहित्य जसे की व्हील चेअर व वॉकर हे रुग्णांना वापरण्यासाठी इनर व्हील क्लबकड़ून देण्यात आले.याबद्दल डॉ.पवित्रा मलगोंडा यांनी सदरचे साहित्य गरजेचे आहे यापुढे देखील अशा प्रकारची मदत गरजूंना केली जाईल, असे सांगितले.यावेळी इतर पदाधिकारी घोषित करण्यात आले.यामध्ये व्हाईस चेअरमन सुचित्रा साखरे, इंटरनेशनल सर्विस ऑर्गनाइजर रेखा माशाळे,एडिटर चंचल जाजू व इतर इसी मेंबर्स डॉ.स्नेहा वेळापूरकर ,प्रीती रणसुभे, कीर्ती हिंडोळे ,मेघा हिंडोळे, प्रतिभा हिंडोळे, वर्षा हिप्परगी,संध्या हिप्परगी, स्वाती शहा, अर्पिता लांडगे ,सोनल जाजू ,कला पटेल ,मीनाक्षी गंदगे, श्रुती वाली, रश्मी सुतार, मयुरी पत्रिके, संजोता पाटील, सावित्री गोरे, मनीषा धोंगडे ,रेखा पाटील ,आरती सांगळे यांच्यासह शहरातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल जाजू व अर्पिता लांडगे यांनी केले तर आभार शीला माशाळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!