अक्कलकोट : तालुका प्रतिनिधीजन सुविधा योजनेअंतर्गत तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सात लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील अडचण दूर होणार आहे. ब्रम्हे घर ते विश्व अकॅडमी पर्यंत होणाऱ्या या रस्त्यामुळे विद्यार्थी, पालकांची देखील मोठी सोय होणार आहे. येत्या आठ दिवसात हा रस्ता पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काँक्रीट रस्त्याची मागणी होती.ती पूर्णत्वास गेली आहे. माजी सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास राठोड,स्वाती खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.यावेळी कल्पना कामनूरकर चंद्रकला घोडके,कमल कामनुरकर, मेताली लंगोटे, काशिनाथ गोटे ,सोनाबाई सुतार, गुरुलिंगप्पा लंगोटे, नागेंद्र घोडके, महिबूब शहाबादे, बाबू मकानदार, श्रीशैल थंब, उदय नरेगल, अरविंद महामुनी, विजय गोगी, राजकुमार पाटील, सुरेंद्र तेलंग आदींसह विश्व अकॅडमीचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.