ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय चलनी नोटांवर देवाचे फोटो असावेत, असं का म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ; वाचा सविस्तर ….!

दिल्ली – देशातील चलनी नोटांवर देवदेवतांचे फोटो असावेत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता या मुद्द्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. नुकतीच केजरीवाल यांनी भारतातील चलनी नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्रीगणेशाचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. देवदेवतांच्या आशीर्वादाशिवाय यश मिळत नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठीही हा आशीर्वाद गरजेचा आहे. त्यामुळं नोटांवर देवदेवतांचे फोटो असावेत. नोटांवर एका बाजूला गांधीजींचा फोटो राहु द्यावा आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असावा, असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीनंतर आता या मुद्द्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केजरीवाल यांच्या या मागणीची खिल्ली उडवत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

‘२०१४ पासून देशात विज्ञानवादाचा प्रसार न होता धर्मांधता पसरावी हा दृष्टिकोन असणारे भाजप व आपसारखे पक्ष देशाला रसातळाला घेऊन जात आहेत. अर्थव्यवस्थेसारखा जटील प्रश्न नोटांवर देवतांचे फोटो घालून सुटेल असे म्हणणारे जनतेला मूर्ख समजत आहेत. नेहरू देशाला वरदान का होते हे यातून स्पष्ट होतं,’ असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!