ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय संघाचा गोलंदाज अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिवाळी संपताच अनेक ठिकाणी विवाह सोहळे मोठ्या उत्साहात सुरु झाले असून नुकतेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने इंस्टाग्रामवरून लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी दिली. यासोबतच खास कॅप्शनही त्याने लिहिले. तो म्हणतो, ‘अस्थाना, तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाने भरलेला दिवस आहे.

आज आम्ही कायमचे एकमेकांचे झालो आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत.’ नवदीपने स्वाती अस्थानासोबत सात फेरे घेतले. स्वातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्ट्सनुसार, स्वाती एक फॅशन, ट्रॅव्हलर आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे. तिचे यूट्यूब चॅनेलदेखील आहे. स्वातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ८० हजार फॉलोअर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!