---Advertisement---

अखेर इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर !

By team
On: November 25, 2023 10:50 AM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून अपत्यप्राप्ती संदर्भात वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती काशीनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहे. त्यावर वादग्रस्त दाखल खटल्यात त्यांना न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.

इंदोरीकर महाराजांनी अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य संदर्भात १९ जून २०२० रोजी संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खटला दाखल आहे. संगमनेर प्रथम वर्ग न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी एस.एम. वाघमारे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होत आहे. या अनुषंगाने २४ तारखेच्या सुनावणीच्या एक दिवस आधीच गुरुवारी इंदोरीकर न्यायालयात हजर झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!